Categories: अधिक

देशभरातील निवृत्तांचा एल्गार, १० आॕक्टोबरला ईपीएफओ कार्यालयांवर धडक !!!

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-केंद्र सरकार आपल्या “१०० दिवसांच्या उपलब्धी”चे गुणगान करीत आहे. मात्र ६७ लाख निवृत्तांच्या आश्वासित मागण्यांकडे गेली सहा वर्षे दुर्लक्ष करीत आहे. याच्या निषेधार्थ व लक्ष वेधण्यासाठी देशभरातील निवृत्त १० आॕक्टोबरला ईपीएफओ कार्यालयावर धरणे धरणार आहेत. पालघर जिल्ह्याशी संबंधित ठाणे, कांदिवली व वांन्द्रे येथील कार्यालयावर जिल्ह्यातून किमान अडीच हजार निवृत्त धडक देतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष अनिल ताहाराबादकर यांनी व्यक्त केला.

भगतसिंग कोशियारी समितीने सप्टेंबर २०१३ ला अहवाल दिलेला असून, किमान तीन हजार पेन्शन महागाई भत्त्यासहीत देण्याची प्रमुख शिफारस केली होती. सत्तेवर येताच शंभर दिवसात अंमलबजावणी करु असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारची पहिली कारकिर्द संपून नव्याचेही शंभर दिवस उलटले आहेत. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या ४ आॕक्टोबर २०१६ च्या निर्णयाची विनाअट तातडीने अंमलबजावणी करावी या दोन प्रमुख मागण्या आहेत.

सरचिटणिस प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष अशोक राऊत, खजिनदार रविंन्द्र कदम, उपाध्यक्ष हेमंत पाटील, सी.टी.पाटील, भगवान सांबरे, बाळा पेडणेकर, सचिव रमेश  पाटील ,दत्ता पाटील ,जे.पी.पाटील,शैलेश राणा, जयप्रकाश झवर आदिंच्या नेतृत्वाखाली तिन्ही ठिकाणी निदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे असेही अनिल ताहाराबादकर यांनी सांगितले.

या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने न्याय न दिल्यास, ५ डिसेंबरला जंतर-मंतरवर देशभरातील निवृत्त आंदोलन करणार आहेत.

Mumbai e News

Email - mumbaienews@gmail.com Contact - 9890086328

Share
Published by

Recent Posts

पालघर: पेसा निधीत भ्रष्टाचार करणाऱ्या ‘त्या’ ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाईसाठी मुहूर्त सापडेना?

डहाणू प्रतिनिधी - विनायक पवार: डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वेती/वरोती ग्रामविकास अधिकारी प्रमोद भोईर यांनी पेसाच्या निधीत भ्रष्टाचार केल्याची तक्रार… Read More

6 months ago

पालघर: मुदतबाह्य सॅनिटायजर वाटप प्रकरणी ‘त्या’ ग्रामसेवकास कारवाईचा झटका

जव्हार प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत न्याहाळे खु. येथे मुदतबाह्य सॅनिटायजर वाटपाबाबत प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या बातमीच्या अनुषंगाने गट… Read More

6 months ago

पालघर : गंजाड मणिपूर येथील खदानीच्या तलावात बुडून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू

डहाणू प्रतिनिधी : जितेंद्र पाटील - डहाणू तालुक्यात एका विद्यार्थ्यांचा गंजाड मणिपूर येथील खदानी मध्ये पोहायला गेला असता बुडून मृत्यू झाल्याची… Read More

6 months ago

पालघर: दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ‘त्या’ तीन अपत्य असणाऱ्या संचालकाचे पद धोक्यात?

तलासरी प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या मार्च महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत कृषी पतपुरवठा मतदार… Read More

6 months ago

पालघर: धक्कादायक! पाण्याच्या कालव्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्रातील केमिकलमिश्रित राख? नागरिकांच्या जीवाशी खेळ..

पालघर प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या बाजूने असलेल्या कासा-भराड सूर्या कालव्यामध्ये कल्लू ढाबा येथून वाहणाऱ्या कालव्यामध्ये औष्णिक विद्युत… Read More

6 months ago

पालघर: …हे म्हणजे ‘त्या’ नर्सिंग होमला पाठीशी घालण्याचा खटाटोप नव्हे का?

डहाणू प्रतिनिधी - विनायक पवार: डहाणू तालुक्यात बापट्स नर्सिंग होम फॉर चिल्ड्रन या खाजगी रुग्णालयाने अवाजवी बिल आकारले असल्याबाबतची बातमी… Read More

6 months ago