पालघर-योगेश चांदेकर

पालघर-डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने आज विधान परिषदेच्या उपसभापती सौ. नीलम ताई गोर्हे ह्यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात झालेल्या रेल्वे महिला सुरक्षा विषयक बैठकीत डहाणू ते वैतरणा विभागातील महिला सुरक्षिततेचे मुद्दे ऐरणीवर आणले तसेच विभागातील सर्व स्थानकांवर लवकरात लवकर CCTV बसविण्याची मागणी केली. विशेषतः महिला डब्यात रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नसणे तसेच स्थानकांवर अधिकृत हमाल उपलब्ध नसणे ह्यासारख्या गोष्टींकडे लक्ष वेधण्यात आले.
सेंट्रलाईज हेल्प लाईन नंबर वर तक्रार केल्यानंतर रिअल टाईम ट्रॅकिंग बाबत विचारले असता लवकरच रेल्वे अशी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे वरिष्ठ रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाश्यांना प्रवासा दरम्यान कुठलीही मोठी इजा झाली तर त्याला नुकसान भरपाई मिळावी त्यासाठी प्रयोजन करण्यास सुचवले गेले.

त्यानंतर संस्थेच्या शिष्टमडळाने पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात CPTM श्री उदय शंकर झा ह्यांची भेट घेतली व विरार लोकल मधे रुपांतरीत करण्यात आलेली पुर्वाश्रमीची दादर डहाणू लोकल पुनर्स्थापित करण्याची मागणी केली. CPTM श्री. उदय शंकर झा ह्यांनी लागलीच DY.COM तिवारी ह्यांना पाचारण करुन संस्थेच्या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याच्या सुचना दिल्या.
त्यानंतर संस्थेच्या शिष्टमंडळाने मुंबई डिविजन च्या कार्यालयात Sr. DOM सौ. सुहानी मिश्रा व Ass. Sr. DOM राजवीर गोपीनाथन ह्यांची भेट घेऊन -दादर डहाणू लोकल पुनर्स्थापित करणे,

  • ५९४४१/४२ ह्या गाडीला वैतरणा स्थानकात थांबा देणे.
  • सर्वमेमू गाड्यांना उमरोळी स्थानकात थांबा देणे.
  • सकाळची ९ः३५ ची डहाणू विरार लोकल अंधेरी पर्यंत विस्तारीत करणे.
  • पहाटे ४ः०० च्या सुमारास डहाणू वरुन मुंबईसाठी लोकल सुरु करणे. तसेच रात्री पालघर बोईसर औद्योगिक वसाहतीतील दुसर्या पाळीच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करणे.
    ह्या मागण्या मुद्देसुद पणे त्यांच्या समोर मांडल्या.
    सर्व मागण्यांवर सारासार विचार करुन निर्णय घेऊ असे आश्वासन श्री गोपिनाथन ह्यांनी शिष्टमंडळाला दिले.
    ह्याच वेळी शिष्टमंडळाने DRM श्री.सुनिल कुमार ह्यांचीही भेट घेऊन -पालघर व बोईसर स्थानकांवर मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी कोच इंडिकेटर्स बसविणे,
  •  डहाणू ते वैतरणा मधील सर्व स्थानकांवरील स्वच्छतागृहांची स्वच्छता करणे.
  • ५९४४१ व ५९४४२ ह्या गाड्यांना वैतरणा स्थानकात थांबा देणे,
  • दादर डहाणू लोकल पुनर्स्थापित करणे इ. मुद्यांवर चर्चा करण्यात आली. श्री. सुनिल कुमार ह्यांनीही दखल घेऊन तातडीने दोन्ही स्थानकांवर कोच इंडिकेटर्स बसविण्याच्या सुचना दिल्या. तसेच सर्व स्थानकांवरील स्वच्छता गृहांचा अहवाल तातडीने मागवून घेतला व ईतरही मुद्यांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
    डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळात अध्यक्ष नागदेव पवार , उपाध्यक्ष सतीश गावड , सहसचिव प्रथमेश प्रभूतेंडोलकर, जनसंपर्कअधिकारी हितेश सावे , सल्लागार श्री. महेश पाटिल, हिमांशु वर्तक व संकेत ठाकूर ह्यांचा समावेश होता. तसेच महिला प्रतिनिधी कु. पुजा कट्टी व कु. दिक्षा संखे ह्या देखिल उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here