तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल

पुरुष, महिला मतदार संख्येत पुणे जिल्हा आघाडीवर

0
1136

 राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदार संख्येत आघाडीवर आहे तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे.

राज्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 पुरुष मतदार, 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 महिला तर 2 हजार 593 तृतीयपंथी अशा एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदारांची नोंदणी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण 40 लाख 19 हजार 664 पुरुष मतदार तर 36 लाख 66 हजार 744 महिला मतदार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 39 लाख 29 हजार 232 पुरुष मतदार तर 32 लाख 97 हजार 067 महिला मतदार आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण 34 लाख 47 हजार 148 पुरुष मतदार आणि 28 लाख 81 हजार 777 महिला मतदार आहेत.

तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 527 तृतीयपंथी मतदार,  ठाणे जिल्ह्यात 460 आणि पुणे जिल्ह्यात 228 तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here