महाराष्ट्रातील पहिली रिक्षा कार वसईतील रस्त्यावर,एस ओ एस प्रणालीसह प्रवाशांच्या सुरक्षीततेसाठी कंपनीने केले आहेत बदल

पालघर-योगेश चांदेकर

महाराष्टातील पहिली रिक्षा कार वसईतील रस्त्यांवर धावत असून प्रवाशांमध्ये त्याची प्रचंड उत्सुकता आहे.बजाज कंपनीने हि रिक्षाकार बाजारात आणली असून त्याचे पहिले ग्राहक हे वसईतील संजय भट हे आहेत.प्रवाशांच्या सुरक्षीततेसाठी या रिक्षा कारमध्ये एस ओ एस प्रणाली दिल्यामूळे आपतकालीन स्थीतीत प्रवाशांना मदतीसाठी पोलिस कंट्रोल रूमशी थेट संपर्क साधता येणार आहे.

गेली सत्ताविस वर्षे वसईत तीनचाकी रिक्षा चालवणा-या संजय भट यांनी १७ मे रोजी बजाज कंपनीने नव्याने आणलेल्या चारचाकी रिक्षाकारसाठी नोंदणी केली होती.२३ मे रोजी विरार प्रादेशिक कार्यालयात त्यांच्या रिक्षा कारची पासींग होऊन त्यांना ती देण्यात आली.या रिक्षा कारची किंमत ३ लाख ५० हजार असून कंपनीने त्यात प्रवाशांच्या सोयीसाठी आमूलाग्र बदल केलेले आहेत.सहा गीअर, प्रवाशांसाठी सिट बेल्ट,सामान ठेवण्यासाठी मोठी डिकी, दरवाज्यांना काचा यामूळे या रिक्षात बसताना चारचाकीतून प्रवास करण्याचे समाधान प्रवाशांना मिळते.विशेष म्हणजे आपातकालीन स्थीतीत प्रवाशांना एस ओ एस प्रणालीद्वारे पोलिस कंट्रोल रूमशी संपर्क साधता येणार असल्यामूळे पोलिसांना हि रिक्शा कार वसईतील कोणत्या ठिकाणी व कोणत्या रोडवरून धावत आहे याची माहिती कंट्रोल रूममध्ये बसून मिळणार आहे.वेळप्रसंगी त्वरीत ते या रिक्षाकारपर्यंत मदतीसाठी पोहचू शकणार आहेत.रिक्षाचालकाला मिटरही आतमध्ये असल्यामूळे पावसाळ्यात ते भीजण्याची भिती नाही.या रिक्षा कारला चारचाकी वाहनासारखे स्टेअरींग असून मागील बाजूस प्रवाशांचे विस किलो सामान ठेवण्यासाठी प्रशस्त जागा करण्यात आली आहे.सि एन जी किट असून प्रवाशांच्या करमणूकिसाठी एफ एम देखील लावण्यात आलेले आहे.सद्या हि रिक्षा कार वसई पश्चिम ओमनगर ते वसई रोड स्थानकादरम्यान भट चालवत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here