पालघर-योगेश चांदेकर

पालघर- मागील अनेक वर्षापासून मागांठणे गावात दिवाळीनिमित्त झुंजीच्या स्पर्धा होत असतात या स्पर्धा बघण्यासाठी पालघर, ठाणे, रायगड, नाशिक अशा जिल्ह्यातून हजारो शेतकरी येत असतात.


अनेक जिल्ह्यातील रेडे मालक या स्पर्धेत सहभाग घेतात आणि त्या रेड्याची जोपासना ही चांगल्या प्रकारे करतात हा दीपावलीचा दिवशीचा सण म्हणजे पूर्ण वर्षभरात शेतकरी शेती करत असतो तरी ह्या दिवशी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय उत्सव आणि आनंद असतो कारण जे रेडे शेतकऱ्यांनी अतिशय मेहनतीने सांभाळले असतात याची किंमत शेतकऱ्याला लाखो रुपये येत असते आणि आपला दिवाळी सण उत्साहात साजरा करत असतात कारण एकीकडून शेतकऱ्यावर एका बाजूने शासन अन्याय करतो तर एका बाजूने निसर्ग अन्याय करतो असं सातत्याने शेतकरी अडचणीत सापडत असतो आणि ह्या दिवशी झुंजीचा स्पर्धा होतात या दिवशी प्रत्येक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो.

या स्पर्धा बघण्यासाठी कमीत कमी 25 ते 30 हजार लोक जमतात या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुडूस गावचे माजी उपसरपंच इरफान भाई सुसे, भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक प्रसाद भाई पाटील, पालघर ठाणे जिल्ह्याचे विभागीय सरचिटणीस कुंदन पाटील, माजी सभापती मंगेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पवार ,स्वाभिमान संघटनेचे तालूकाध्यक्ष रवींद्र मेणे, श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद धुले ,शिवसेनेचे नालासोपरा विक्रमगड विधानसभा संपर्कप्रमुख गोविंद पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते

या स्पर्धा पार पडण्यासाठी मागांठाणे ग्रामस्थ मंडळांकडून चार दिवस खूप मेहनत घेतली जाते झुंजी ज्या मैदानावर होतात त्या मैदानाला चार बाजून कुंपण केलेलं असतं प्रेक्षकांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली असते प्रमुख मान्यवरांना बसण्यासाठी व्यासपीठ बनवलेलं असतं कुणालाही दुखापत होणार नाही याची संपूर्ण काळजी घेऊन या स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडले जातात या स्पर्धा पार पाडण्यासाठी ग्रामस्थ जितेश पाटील ,विजय पाटील, इरफान सुसे ,अजित पाटील, उमेश पाटील, सचिन पाटील, हेमंत पाटील ,संजय पाटील, हितेश पाटील त्यात ग्रामस्थ मेहनत घेत असतात सहभागी होणाऱ्या स्पर्धाकाना सन्मानचिन्ह शाल देऊन सत्कार केला जातो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here