पालघर: चाराण्याची कोंबडी झाली बाराण्याला; चिकनच्या मागणीत वाढ!

0
632

पालघर – योगेश चांदेकर:

चिकन खाल्ल्याने कोरोना होतो या अफवेमुळे मार्च व एप्रिल महिन्यात चिकन खाणाऱ्यांमध्ये चांगलीच घट झाली होती. त्यामुळे चिकनच्या दरात मोठ्या प्रामाणात घसरण झाली होती. शंभर रुपयांना तीन ते चार जीवंत कोंबड्या विकण्याची वेळ चिकन विक्रेत्यांवर आली होती. काहीजणांनी तर जिवंत कोंबड्या फुकट वाटल्या. अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी भलामोठा खड्डा खोदून कोंबड्यांची जिवंत पिल्लं पुरून टाकली होती. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र, सध्या या व्यवसायाला अच्छे दिन येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शहर परिसरात सध्या प्रति किलो 180 रुपयांनी जिवंत कोंबडी (चिकन) याप्रमाणे विक्री केली जात आहे. तरीही खरेदीसाठी चिकन दुकानात खवय्यांची गर्दी होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चिकनबद्दल अनेक अफवा पसरविण्यात आल्या होत्या. यामुळे चिकन घेण्यास कोणीही तयार नव्हते. परिणामी चिकन विक्रेत्यांनी दर कमी करून जीवंत कोंबड्यांची विक्री केली. यामुळे त्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे कोट्याधींची उलाढाल थंडावली. अफवा कमी झाल्यानंतर चिकन खाणाऱ्यांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. लॉकडाऊनपूर्वी सुमारे प्रतिकिलो 160 रुपयांना जिवंत कोंबडीची (चिकनची) विक्री केली जात होती. सध्या 180 प्रति किलो चिकन विक्री केली जात आहे.

“शहरातील चिकनची बहुतांशी दुकाने सुरु झाली आहेत. सध्या 180 रुपये प्रति किलो जिवंत कोंबडी (चिकन) असा दर आहे. तरीही खरेदीसाठी चिकन दुकानात खवय्यांची गर्दी होत आहे. पक्षांची कमतरता भासल्यास दरात अजून वाढ होऊ शकते.” – जावेद लूलानिया, चिकन विक्रेता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here