पालघर: डहाणू समुद्र किनाऱ्यावर आढळला ४०-४५ फूट लांब १० फूट रुंद मृत व्हेल मासा..!

0
626

पालघर – योगेश चांदेकर:

२३ मे २०२० रोजी सकाळी पालघर जिह्ल्यातील डहाणू तालुक्या मधील डहाणू समुद्र किनाऱ्यावर बलिन व्हेल म्हणजेच देवमासा वाहून आल्याची घटना घडली आहे. मासेमारीच्या कारणामुळे तसेच प्रदूषणामुळे सागरी सस्तन प्राण्यांचे कमी होणारे प्रमाण हे त्यांच्या लोकसंख्येसाठी मोठा धोका मानला जातो. सर्व समुद्री सस्तन प्राणी हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील वेळापत्रक १ अंतर्गत संरक्षित आहेत. समुद्र किनाऱ्यावर मृत देवमासा वाहून येणे सामान्य गोष्ट नाही असे मत प्राची हटकर प्रकल्प संशोधक यांनी व्यक्त केले आहे आहे.

व्हेलचे शव हे ४०-४५ फूट लांब १० फूट रुंद होते. व्हेल हा संपूर्ण जलचर प्लेसेंटल सागरी सस्तन प्राण्यांचा व्यापकपणे वितरित आणि वैविध्यपूर्ण गट आहे. व्हेल माशाचे मृत शरीर खूप कुजलेल्या अवस्थेत आढळून आले असल्याने त्याची प्रजाती ओळखणे शक्य नाही असे समजते. वन्यजीव संरक्षण 1972 अधिनियमानुसार सागरी सस्तन प्राण्यांचे मृतदेह पोस्टमॉर्टम करणे बंधनकारक नसले तरी, राष्ट्रीय स्तरावरील सागरी संरक्षित गटांच्या अधिक जागरूकतेची आणि विकासाची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आणि व्हेल माशाच्या मृत्यूचे कारण समजण्यासाठी दफन करण्यापूर्वी त्याचा अभ्यास केला पाहिजे असेही त्यांचे मत होते. सायंकाळी ६ च्या सुमारास समुद्र किनारी जेसीबीने खड्डा खोदून व्हेल माशाचे दफन करण्यात आले.

“प्रत्येक वर्षी मृत व्हेल मासा किनाऱ्यावर वाहून येत आहे आणि जर अशा घटना परत परत होत आहे तर त्याचा अर्थ असा आहे की समुद्रात पोल्युशन वाढले आहे आणि त्यावर सरकारने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा समुद्र संपती नष्ट होऊ लागेल. व्हेल मासा, डॉल्फिन मासा, समुद्री कासव आणि समुद्रातील इतर प्राणी, वनस्पती यांची एक साखळी आहे जी समुद्र साफ ठेवायचं काम करते. जर ही साखळी तुटली तर मोठा विनाश होऊ शकतो.” – धवल कंसारा, मानद वन्यजीव रक्षक (पालघर जिल्हा – महाराष्ट्र वन विभाग)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here