पालघर: साधू हत्याकांड; फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी झेपावले ड्रोन

0
390

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर तिहेरी हत्याकांडाचा तपास आत्ता सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणातील 110 जणांना अटक झाली असली तरीही अद्याप 200 ते 300 जण अजूनही जंगलात फरार आहेत. जंगल घनदाट असल्याने शोध मोहिमेत मोठा अडथळा येत आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी आता चार ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे फरार असलेल्या आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्यास मदत होईल.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालक्यातील गडचिंचले गावात दोन साधू आणि वाहनचालकाची चोर असल्याच्या गैरसमजातून गावकऱ्यांनी हत्या केली होती. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध आता ड्रोनच्या मदतीने घेतला जाणार आहे.

अटकेतील १०१ जणांपैकी एकही आरोपी मुस्लिम नाही – गृहमंत्री

दरम्यान या हत्या प्रकरणातील पोलीसांच्या ताब्यातील १०१ आरोपींपैकी एकही आरोपी मुस्लिम नसल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे प्रकरणाला धार्मिक तसेच जातीय रंग देण्यात येऊ नये असंही ते म्हणाले. सिआयडी या प्रकरणाचा तपास करत असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. पालघरमधील आदिवासी भागामध्ये घडलेली हत्येची घटना दुर्दैवी आहे. दुर्गम भागातील गावात चोर शिरल्याच्या अफवेतून हा प्रकार घडला. वेषांतर करुन लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा आदिवासी भागामध्ये पसरली होती, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

घटनेनंतर आठ तासात पोलिसांनी 101 आरोपींना जंगलातून शोधून ताब्यात घेतलं. त्यांची यादी आज जाहीर करत आहे. त्यापैकी एकही मुस्लीम बांधव नाही. तिन्ही साधू ‘ओये बस’, ‘ओये बस’ म्हणत होते, मात्र त्याचा ‘शोएब’ असा विपर्यास केला. त्यामुळे जातीचा रंग देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करु नका, असं देशमुखांनी सुनावलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here