आता घरबसल्या अपडेट करा, आधार कार्डवरील पत्ता विनाशुल्क, एका क्लिकवर!

0
546

MUMBAI e NEWS:

आधार कार्ड वरील पत्ता अद्ययावत करण्यासाठी खालील गोष्टींचे अनुकरण करा

  • UIDAI वेबसाईटवर जा.
  • तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असतील तर या वेबसाईटवर Proceed to update Address या टॅबवर क्लिक करा.
  • सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने जमा करा.
  • जरी तुमच्याकडे पत्त्याचा आवश्यक पुरावा नसला तरी तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील पत्ता ‘address validation letter’ च्या माध्यमातून  अद्ययावत करू शकता. 
  • Request for Address Validation Letter ही एकूण चार टप्प्यांची प्रक्रिया आहे.
    1. नागरिकांकडून पत्ता अद्ययावत करण्याची विनंती पत्ता पडताळणी करणाऱ्याकडे नोंदविली जाते.
    2. पत्त्याची पडताळणी करणारी व्यक्ती ही विनंती मान्य करते.
    3. त्यानंतर पत्ता अद्ययावत करण्यासाठी नागरिकांकडून UIDAI कडे विनंती सादर केली जाते.
    4. एक सांकेतिक क्रमांक संबंधित पत्त्यावर पत्राच्या माध्यमातून पाठविला जातो. तो योग्य पद्धतीने भरल्यावर पत्ता अद्ययावत करण्याची विनंती मंजूर केली जाते.
    • Proceed to update Address  येथे क्लिक करून थेट आधारच्या पत्ता अपडेट साठी प्रोसेस सुरू करा.

आपण नजीकच्या आधार नोंदणी अथवा सेवा केंद्रावर जाऊनही आपला पत्ता अद्ययावत करू शकता. फक्त यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. सर्व ओरिजनल कागदपत्रे या ठिकाणी बघितली जातात आणि तुम्हाला परत दिली जातात. यासाठी ठराविक शुल्क आकारले जाते. जे तुम्हाला देणे गरजेचे आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here