पालघर – योगेश चांदेकर :
आजचे युग सोलर एनर्जीचे युग म्हणून उदयास येत आहे. प्रत्येक ठिकाणी व्यवहारात सोलर ऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अमर्याद होणार इंधनाचा वापर, त्यामुळे वाढते प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा होणार ऱ्हास थांबविणासाठी आदिवासी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पालघर येथील निदेशक के. बी. आहेर यांना सुचलेल्या कल्पनेला त्यांच्या इलेक्ट्रीशियन या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांनी प्रत्यक्षात उतरवले.

भंगारातून विकत घेतलेल्या एका वाहनाला सोलर ऊर्जेचा वापर करून गिअर सोलर व्हॅनची निर्मिती करण्यात आली. या बनविलेल्या सोलर व्हॅनमूळे, सोलर एनर्जीचा वापर करून व इंजिनमुळे निकामी झालेल्या वाहनांचा व्यवहारात पुन्हा वापर करता येऊ शकतो. कारण या सोलर व्हॅनमध्ये इंजिन नसल्यामुळे इंधन वापरायचा प्रश्नच येत नाही. ही सोलर व्हॅन दिवसा सोलर ऊर्जेवर व रात्रीच्या वेळेसाठी बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. येथे बहुतांश ग्रामीण भागातील प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या व्यवसायात प्रशिक्षण घेतात.

सोलर व्हॅन बनविताना आजीमाजी विद्यार्थी या उपक्रमातून त्यांच्या अंतर्भूत कौशल्याच्या सर्वांगीण विकास होण्यास चालना मिळाली. व या उपक्रमासाठी संस्थेचे प्राचार्य एस. एन. परदेशी आणि निदेशक जीवन पाटील व निदेशक डी. व्ही. गवस यांचे बहुमोल मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here