पालघर : योगेश चांदेकर-
बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीत काम करणारे नाका कामगार, माथाडी तसेच बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स हे खैरे पाडा ब्रिज लगत पालघर वळण रस्त्यालगत अनेक वर्षापासून एका झाडाखाली बसत आहेत. मात्र सदरची जागा एम आय डी सी ने जे यस डब्लू कंपनीला शुशोभीकरणाकरिता दिली आहे. मात्र हि जागा त्या व्यावसायिकांसाठी सोडण्यास कंपनीचे अधिकारी तयार नाहीत.

त्यामुळे आज कंपनीचे अधिकारी जेसीबी घेऊन आले व पुन्हा एकदा जिंदाल कंपनीने एम आय डी सी अधिकारी व पोलीस बंदोबस्तात वर्षोनुवर्षे बसत असलेले व्यावसायिक यांना दहशतीच्या मार्गाने हुसकविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस हि घटना कळताच कुंदन संखे यांनी पुन्हा एकदा स्थानिक भूमीपुत्रांच्या मागे खंबीर पणे उभे राहत जिंदाल च्या अधिकाऱयांना सज्जड दम भरला, जे सी बी च्या सहाय्याने खोदलेला खड्डा पुन्हा भरायला लावला व जिंदाल चे अधिकाऱ्यांना लवाजम्यासह माघारी धाडले.

त्याचबरोबर पुन्हा असा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू असा इशारा कुंदन संखे यांनी अधिकाऱ्यांना दिला. स्थानिक भूमिपुत्रांना हि जागा सोडावी अशी विनंतीही त्यांनी केली. जिंदाल कंपनीने कधीही स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी दिली नाही. जी जागा शुशोभीकरणाकरिता दिली आहे ती जागा सर्वसामान्यांसाठी आहे त्यामुळे या जागेवर कोणीही हस्तक्षेप करू नये असा इशाराही संखे यांनी दिला.

सदर प्रसंगी उपस्थित सर्व नाका कामगार, माथाडी कामगार, व्यावसायिक यांनी कुंदन संखे यांचे स्थानिक भूमीपुत्रांच्या मागे उभे राहिल्याबद्दल पुनश्च एकदा आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here