पालघर – योगेश चांदेकर:

पालघर तालुक्यातील माहिम ग्रामपंचायत हद्दित येणाऱ्या साईबाबा नगर येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या संशयितांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केली होती. या बातमीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी याप्रकरणाची शहानिशा करत आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच जेवणाच्या दर्जादेखील सुधारला आहे अशी माहिती क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांनी दिली आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी असणाऱ्या क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांबाबत जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.

दरम्यान क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांना निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येत होते. तसेच कॉमन शौचालयाची योग्यपद्धतीने व वेळेवर साफ सफाई केली जात नसल्याची माहिती त्या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांनी मुंबई ई न्यूजचे पालघर प्रतिनिधी योगेश चांदेकर यांना कळवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here