मीरारोड wockhardt रुग्णालयात पोलीस योद्‌ध्यांची आरोग्य तपासणी!

0
372

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पोलीस योद्‌ध्यांना संसर्गाचा विळखा अधिक घट्ट होत असून राज्यात २४ तासांत तब्बल ११५ पोलीसांना या आजाराची लागण झाली आहे. राज्यात आता ३४२ पोलीस कोरोनाबाधित आहेत. एकट्या मुंबईत १४३ पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे. याकरता खबरदारी म्हणून मीरारोड येथील wockhardt रुग्णालयाने पोलीसांसाठी आरोग्य तपासणी शिबीर भरवले होते.

मीरारोड येथील wockhardt रुग्णालय व नयानगर पोलीस ठाणे मिरा रोड यांच्या संयुक्त विदयमाने खास पोलीसांसाठी वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नयानगर पोलीस ठाण्यातील १५-२० पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासन दिवसरात्र रस्त्यावर काम करत आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने राज्यात अनेक पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून रुग्णालय प्रशासनाने पोलीसांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबीरात रक्तदाब, शरीराचे तापमान, डायबेटिस आणि छातीचा एक्स-रे या तपासण्या करण्यात आल्या असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here