पालघर : योगेश चांदेकर –

मुंबई-रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. रिपब्लिकन पक्षाचे रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी रिपब्लिक डे च्या शुभेच्छा देताना रिपब्लिक डे आणि रिपब्लिकन पक्षाचे नामसाधर्म्य साधत दिलेल्या शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुहास्य वादनाने हस्तांदोलन करीत स्वीकारल्या.
राष्ट्रपती भवनात आज 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन ना. रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी प्रजासत्ताक सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले ब्राझील चे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांची ही भेट घेऊन त्यांना भारतीय प्रजसत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. रिपब्लिक डे च्या शुभेच्छा देताना ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या नामोल्लेखाने रिपब्लिक डे शी नामसाधर्म्याचे उपस्थितांमध्ये कौतुकमय चर्चा होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here