पालघर: जिल्हा परिषद शिक्षण विभागातील ‘त्या’ प्रकरणाची होणार चौकशी..!

0
519

पालघर – योगेश चांदेकर:

जिल्हा परिषद शिक्षण विभागात सर्व काही आलबेल नसल्याची बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केली होती. या बातमीची तत्काळ दखल घेत जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी सदर प्रकारे जर कुणी चुकीची माहिती देऊन बदली लाभ घेतला असेल तर ही घटना गंभीर असून याची चौकशी करण्यात येणार आहे अशी माहिती दिली. याप्रकरणी चौकशीचा आहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी मुंबई ई न्यूजशी बोलताना सांगितले.

२०१९ मध्ये शिक्षक बदलीमध्ये संवर्ग १,२,३,४ अंतर्गत अनियमितता झाली असल्याची माहिती मुंबई ई न्यूजला मिळाली होती. यासोबतच काही शिक्षक हे नियुक्तीच्या ठिकाणी काम न करता जिल्ह्यातील इतर कार्यालयीन कामात सक्रीय असल्याच्या गोष्टीकडेही लक्ष वेधले होते. जिल्हापरिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती नीलेश सांबरे यांनी देखील बातमी प्रसिद्ध होताच मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांच्याकडे संपर्क साधत या प्रकरणाची माहिती घेतली. बदलीसाठी संवर्ग १ व इतर संवर्ग अंतर्गत लाभ घेण्यासाठी जर कुणी चुकीची माहिती सादर केली असेल तर याची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here