असंवेदनशीलतेचा कळस: …म्हणून ‘त्या’ नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले!

0
425

कल्याण – योगेश चांदेकर:
सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असतांना आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावत असतानाचे चित्र एकीकडे असतांना दुसरीकडे मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या वसाहतीत राहू देत नसल्याचे उघड झाले आहे. कल्याणच्या तिसगाव येथे राहत असलेल्या नायर हॉस्पिटल मधील नर्सला चाळीतील घर सोडून जाण्यासाठी दबाव वाढला असून तिच्यावर बहिष्कार टाकला जात आहे. कहर म्हणजे तिच्या अंगावर थुंकण्याचा प्रकार उघड झाला आहे. गेले पाच दिवस हा प्रकार सुरु आहे अशी माहिती त्या नर्सने स्वतः एका वृत्तवाहिनीला बोलताना दिली आहे.

राज्यात संशयित रुग्णांवर बहिष्कार घातला जात असल्याच्या घटना समोर आल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हीनतेची वागणूक देणाऱ्यांविरोधात कडकी कारवाई करणार असल्याची घोषणा केली होती. इतरांच्या आरोग्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या परिचारिकेलाच अशी वागणूक देणाऱ्या समाजातील विकृतांना काय शासन होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here