टोमॅटोवरील विषाणूचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही..!

0
499

मुंबई:

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर टोमॅटोवर कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचा अफवा पसरविल्या जात आहेत. तसेच या व्हायरसचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचेही सांगितले जात आहे. सोशल मीडियावरील हे संदेश केवळ अफवा असून, या विषाणूंचा कोणताही प्रादुर्भाव मानवी आरोग्यावर होत नाही. या केवळ अफवा असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ प्रा.किरण जाधव यांनी म्हटले आहे.

बंगळूरु येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतंर्गत भारतीय बागवानी अनुसंधान केंद्राने महाराष्ट्रातील फलटण, अकोला व इतर भागातून टॉमेटोचे नमुने घेतले होते.

नमुन्यांची तपासणीअंती या टोमॅटोवर कुकुंबर मोझॅक, टोबॅको मोझॅक, ब्रक्ट नेक्रॉसीस व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या व्हायरसमुळे असमान पक्वता, रंग पिवळसर पडणे, फळात पोकळपणा, रसविरहीत फळ तयार होणे अस लक्षणे तयार होत असतात. मात्र, व्हायरसबाबत सोशल मीडियावरील अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. विषाणूयुक्त फळ खाल्ल्याने मानवी आरोग्य धोक्यात येते असे म्हटले जात आहे. मात्र, या केवळ अफवा असून, हे विषाणू केवळ वनस्पतीवर येणारे आहेत. याचा कधिही मानवी आरोग्याला धोका राहत नाही असेही प्रा.किरण जाधव यांनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here