मोबाईल पाण्यात पडला, काळजी करु नका; लगेच करा ‘हे’ उपाय

0
493

MUMBAI e NEWS:

आपल्या हातात मोबाईल नसेल तर आपल्यातील कित्येक जण बेचैन होतात. त्यात जर आपल्या निष्काळजीपणामुळे मोबाईल पाण्यात पडला तर… आपली तार सटकते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला मोबाईल फोन पाण्यात पडल्यानंतर फोनचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला लगेचच कोणते उपाय करता येऊ शकतात हे सांगणार आहोत.

मोबाईल काही कारणास्तव पाण्यात पडल्यास किंवा भिजल्यास सर्वात आधी तो कोरड्या जागी ठेवा. मोबाईल जास्त हलवू नका आणि त्याला लगेचच कोरड्या कापडाने पुसून घ्या.

मोबाईल पाण्यात पडल्यावर त्याचे कोणतेही बटण चालू करण्याचा किंवा टचस्क्रिनला दाबण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे मोबाईलचे कोणतेही फंक्शन चालू होऊन डिव्हाइसचा बोर्ड क्रॅश होण्याची शक्यता असते.

मोबाईलमधील सिम कार्ड आणि एसडी कार्ड बॅटरी सोबतच सुद्धा बाहेर काढा. तसेच त्याचा ट्रे सुद्धा बाहेरच राहू द्या. पाण्यात मोबाईल पडल्यावर कोरड्या कापडाने पुसून घ्या मात्र फोनमध्ये जास्त पाणी असल्यास त्याला व्हॅक्युम क्लिनर किंवा ड्रायरने तो कोरडा करा.

यानंतर फोनमधील ओलावा कमी करण्यासाठी एका पिशवीत तांदूळ घेऊन त्यात फोन ठेऊन द्या. तांदळातील हीग्रोस्कोपिक गुण मोबाईलमधील ओलावा दूर करण्यास मदत करतात.

यानंतर जेव्हा तुम्हाला वाटेल की मोबाईलमधील ओलावा कमी झाला आहे. तेव्हा फोन मोबाईल टेक्निशियनकडे नेऊन दुरूस्त करा. स्वतःहून फोन चालू करण्याचा प्रयत्न करु नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here