पालघर: ग्रामपंचायत प्रशासनाला झालंय तरी काय? कोरोना योद्ध्यालाच गावबंदीचा फतवा..!

0
450

पालघर – योगेश चांदेकर:

ग्रामपंचायत प्रशासन म्हणजे नागरिकांशी बांधिलकी जपणाऱ्या प्रशासनातील शेवटचे टोक. कोरोनाच्या संकटाशी दोन हात करणाऱ्या कोरोना योद्ध्यालाच गावबंदीचा फतवा बजावला जातोय का अशी परिस्थिती आहे. डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला सरपंचाने चक्क सेवेवर जाण्यासाठी ये जा न करता कामाच्या ठिकाणी राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

सविस्तर बातमी अशी कि अजय महादेव डोंभरे हे डहाणू पोलीस ठाण्यामध्ये सेवेत असून ते सध्या घरापासून १०-१२ किलोमीटर अंतरावर जिल्ह्यातच सेवा बजावत आहेत. यासाठी ते रोज घरातूनच ये-जा करत आहेत. मात्र ते जिल्ह्याबाहेर जात असल्याचा ठपका ठेवत ग्रामपंचायतने त्यांना सदर नोटीस दिली आहे. कामाच्या ठिकाणी येजा केल्याने गावात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो असा दावा यामध्ये करण्यात आला आहे. मात्र आपल्या कामाबद्दल पुरेशी माहिती न घेताच ग्रामपंचायतने हि नोटीस दिली असल्याचे मत पोलीस कॉन्स्टेबल अजय डोंभरे यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता जिल्ह्याबाहेर कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले, जिल्ह्यातल्या जिल्ह्यात ये-जा करणाऱ्यांबाबत असा कोणताही आदेश अद्याप जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे कोरोना योद्धयांना सन्मानाची वागणूक मिळावी तसेच त्यांना अडथळे निर्माण न करता प्रोत्साहित करणे समाजाच्या हिताचे असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here