अंकलेश्वर पाटील यांचा उत्कृष्ट शिक्षक म्हणून राज्यस्तरावर गौरव

0
1897

योगेश चांदेकर (पालघर)

पालघरसारख्या ग्रामीण जिल्ह्यातील खेडेगावात शिक्षक म्हणून काम करणे तसे अवघडच. अनेकदा शाळांमध्ये सोयीसुविधांची वानवा आणि विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत हलाखीची असल्यानंतर हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकविणे हे शिक्षकापुढचे आव्हान असते. या आव्हानाला सामोरे जात पालघर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक अंकलेश्वर पाटिल यांनी शिक्षक म्हणून केलेल्या कष्टाचं चिज झालं असून त्यांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

अंकलेश्वर हे अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे. शाळा कितीही दुर्गम भागात असली तरी आपल्या जबाबदारीचं भान राखत शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत राहणं हा त्यांचा गुणविशेष आहे. आजवर त्यांनी तलासरी सारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यातील डोंगरीकोची सारख्या डोंगराळ भागातील शाळेत काम केलं आहे. तर पालघर मधील धनानी नगर, उनभाट दहिसर तर्फे तारापूर ह्या शाळांमध्ये आपल्या शैक्षणिक कामाची चुणूक दाखविली आहे. सद्या ते चिंचणी येथील शाळेत कार्यरत असून त्यांच्या शैक्षणिक कामाची दखल जिल्हा परिषद व पंचायत समितीनेही त्यांना यापूर्वी गौरविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here