पालघर-योगेश चांदेकर

पालघर- दोन वर्षात संपूर्ण पालघर जिल्हा पिंजून साडेपाच हजार सभासदांना एका छताखाली आणणारे कुशल संघटक अनिल ताहाराबादकर यांच्या कर्तृत्वाची दखल घेत त्यांची ईपीएस्-९५ महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी निवड करण्याचा निर्णय केंद्रीय कार्यकारिणीने घेतला आहे.
थेट केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी वगळता सर्व आस्थापना ईपीएस्-९५ योजनेखाली येतात, या योजनेद्वारे मिळणारे पेन्शन अत्यंत अत्यल्प आहे. देशभरात पासष्ट लाख निवृत्त असुनही संघटीत नसल्याने न्याय मिळत नाही. हे लक्षात घेऊन ईपीएस्-९५ समन्वय समिती देशभरातील निवृत्तांना संघटीत करुन लढा उभारीत आहे. पालघर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा स्विकारल्यानंतर अनिल ताहाराबादकर यांनी जिल्हा अक्षरशः पिंजुन काढला व पिडीत,निराश निवृत्तांमधे नवी उमेद भरली. त्यांच्या महाराष्ट्र पातळीवरील निवडीचे अनेकांनी स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here