अबब…थंडीतही कुपनलीकेतून येतय गरम पाणी…!

0
1299

पालघर-योगेश चांदेकर :

पालघर-डहाणू तालुक्यातील चिखले केंद्र शाळेच्या आवारातील कुपनलीकेतून शनिवार, 28 डिसेंबर रोजी सकाळी गरम पाणी येण्यास प्रारंभ झाला असून हा चमत्कार पाहण्यासाठी रविवारी दिवसभर नागरिकांनी गर्दी केली . दरम्यान डहाणू तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी बी. एच. भरक्षे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी नमुने तपासणीकरिता पाठवले आहेत. मागील तीन महिन्याच्या कालावधीत ही दुसऱ्यांदा पुनरावृत्ती असून नागरिकांमध्ये कुतूहल व्यक्त होत आहे.

शनिवारी सकाळी या कुपनलीकेतून गरम पाणी निघत असल्याचा अनुभव काही ग्रामस्थांना आला होता. मात्र सायंकाळपासून हा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली, ती रविवारी पूर्ण दिवस होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सूचना फलक लावण्यात आला. दरम्यान रविवारी दुपारी दीडच्या सुमारास डहाणू तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी बी. एच. भरक्षे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पाणी नमुने गोळा करण्यासह, भूगर्भ तसेच जिल्हा आपत्ती विभागाला प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here