आधी काम करा मग या मत मागायला ; खारलेपाडा ग्रामस्थांचा इशारा

2
2246

पालघर : योगेश चांदेकर

पालघर- विधानसभा निवणुकापूर्वी जर गावातील समस्या दूर नाही झाली तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

मूलभूत गरजांशी रोज नव नवी लढाई करणारे एक छोटेसं गाव आपल्या देशात आहे. विकास इथं शोधावा लावतोय. इथं ग्रामस्थांच्या संघर्ष प्रत्येक दिवसाशी आहे मुलभुत
गरजा सरकार येथे उपलब्ध करू शकत नाही याचे दुःख येथील नागरिकांना आहे

रस्ते आणि स्मशानभूमी मोठी समस्या..

पालघर तालुक्यातील मोरेकुरण ग्रामपंचायत हद्दीतील खारलेपाडा येथील विजय बाळकृष्ण पाटील यांचे दि. ७ सप्टेंबर रोजी निधन झाले.परंतु त्या दिवशी जोरदार पाऊस होता आणि खारलेपाडा येथे स्मशानभूमीवर शेड नसल्यामुळे अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न निर्माण झाला. आजतागायत खारलेपाड्याला कोणत्याच सुविधा मिळत नाहीत.
या ठिकाणी आदिवासी व भंडारी समाज मोठ्या संख्येने राहतात. या पाडयात पिण्याचे पाणी देखील नाही. रस्ता
केला तो ही अर्धवट. गावाला स्मशान समस्या कायम आहे ग्रामसभेत ठराव मांडून देखील कोणतीच कारवाई होत नाही अशामुळे प्रेत अंत्यसंस्कारासाठी पालघर येथे नेण्याची वेळ नागरिकांवर येत आहे

पाणी समस्या कायम..

खारलेपाड्यात पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था आहे. पाड्यात ४ बोअरवेल आहेत .खारलेपाडावासी
गावातून गेलेल्या खारेकुरण ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनच्या प्रेशरवाँलमधून पडणारे पाणी ताटकळत बसुन जमा करून पिण्यासाठी वापरतात, एवढी गंभीर परिस्थिती गावात आहे.
मोरेकुरण ते खारलेपाड्यात येणारी पाईपलाईन पालघरच्या नगरपरिषदेच्या डंपिंग ग्राऊंड जवळून येत आहे. मात्र ती सतत नादुरुस्त होते.आता पर्यंत लाखो रूपये खर्च झाले परंतु खारलेपाड्यात पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकली नाही.
ग्रामसभेत पिण्याच्या पाण्याचा विषय प्रत्येक वेळी मांडला जातो परंतु थातुरमातुर उत्तरे देऊन ग्रामस्थाची बोळवण केली जाते. यामुळे स्थानिकांमध्ये मोठी नाराजी आहे. पालघरहून पाणी मिळण्याची मागणी केली असता तेथून पाणी मिळणार नाही असे उत्तर मिळत आहेत.


तसेच गाव जवळ असताना देखील पालघरच्या नगरपरिषदेच्या डंपिंगला परवानगी देण्यात आली. डंपिंगचा देखील खारलेपाडा वासियांना खूप त्रास होत आहे. त्याकरिता आमदार-खासदार पालकमंत्री, तहसीलदार, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद सर्वाना पत्रव्यवहार केले आहेत. मात्र अद्यापही प्रतिसाद नाही

वारंवार ग्रामस्थानी याबाबत पत्रव्यवहार करून सुद्धा लक्ष दिले जात नसून स्वातंत्र्यापासून गाव विकासापासून कोसो दूर आहे. स्मशानभूमीचा प्रश्न आजही ‘जैसे थे’ आहे.शेड नसल्याने पावसाळ्यात अंत्यविधी साठी प्रॉब्लम होतात. त्यामुळे एखादी दुःखद घटना घडली तर थेट 4 ते 5 किमी लांब पालघर येथे जावे लागते.मागील लोकसभा निवडणुकीमध्येच मतदानावर बहिष्कार टाकणार होतो ,पण आश्वासन दिले म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत.

चंद्रकांत पाटील, ग्रामस्थ,खारलेपाडा

2 COMMENTS

  1. खूप वर्षा पासून त्रास आहे। या ग्रामपंचायत चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here