कापूस उत्पादनात ७ लाख टन गाठींची घट होण्याचा अंदाज – भारतीय कापूस महामंडळ

2
1705

कापूस उत्पादनात आणखी २ लाख गाठींनी घट होण्याचा अंदाज असून, यावर्षीच्या हंगामात ३२८ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज कापूस उद्योगाने व्यक्त केलाय. यापूर्वी गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कापूस उद्योगाने उत्पादनात ५ लाख गाठींची घट होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर पुन्हा एकदा यात आणखी २ लाख गाठींनी घट होण्याचा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ७ लाख टन (१ गाठ – १७० किलो) कापूस गाठींची घट होणार आहे.

भारतीय कापूस महामंडळ (सीएआय)चे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले की, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये कापूस उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज आहे. तर गुजरात आणि महाराष्ट्र या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर होणार असून मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन घटणार आहे. गुजरातमध्ये देखील चालू वर्षीच्या हंगामात उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये ८३.५० लाख गाठी उत्पादनाची शक्यता आहे. मागील वर्षी गुजरातमध्ये या कालावधीत १०१.८० लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले होते. यंदा महाराष्ट्रामध्ये ७७ लाख गाठी, तेलंगणात ४३ लाख गाठी, आंध्रप्रदेशात १६ लाख गाठी तर कर्नाटकात १५ लाख गाठी कापूस उत्पादन होण्याची शक्यता असल्याचेही गणात्रा यांनी स्पष्ट केले आहे.

लोकशाही.न्यूज

2 COMMENTS

  1. अभिनंदन .sir
    खूप चांगल काम करत आहे आपण .असच पुडे करत राहा .आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेछा .(अभिनंदन .sir)
    (लोकशाही न्यूज़ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here