

पालघर-योगेश चांदेकर
तालुक्यातिल वाडा कोंढले येेेथे असलेल्या कॅपेसिटी स्ट्रक्चर्स लि. या कंपनीतील शेकडो कामगारांचा लाखो रुपयांचा भविष्य निर्वाह निधी सरकारी कार्यालयात न भरता संचालकांनी तो हडपला असल्याचे समोर आले आहे. तर मार्च 2018 पासून कर्मचाऱ्याचा पगार रखडवला असल्याने व्यथित कर्मचाऱ्यांनी 25 जून रोजी आत्मदहणाचा ईशारा एका निवेदनातून
दिला आहे. याच कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी 13 डिसेंबरला आमरण उपोषण केले होते त्यावेळी तहसीलदार व कामगार आयुक्तांनी मध्यस्थी केल्याने पगार लवकरच देण्याचे आश्वासन
कंपनी प्रशासनाकडून दिले होते मात्र प्रत्यक्षात फक्त दोन,दोन हजार रुपये देऊन त्यांची बोळवण केली आहे.
थकीत वेतन व भविष्य निर्वाह निधी लवकरच मिळावा अन्यथा 25 जून रोजी आम्ही कंपनी समोर सामुदायिक आत्मदहन करू असा ईशाऱ्याचे निवेदन पालघर जिल्हा अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, वाडा तहसीलदार, वाडा पोलीस निरीक्षक, तसेच कंपनी प्रशासन दिले आहे.