कॉंग्रेसचा जाहीरनाम्यात शेतकरी, दलित, महिला आणि तरूणांना प्राधान्य

0
1175

कॉंग्रेसने आज मंगळवारी नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शेतकरी, दलित, महिला आणि तरूणांना प्राधान्य देण्यात आले असून जाहीरनाम्याची निर्मिती १२१ ठिकाणावर भेट देऊन करण्यात आल्याचे यावेळी चिदंबरम यांनी सांगितले.  राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण यासह अनेक मुद्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. बेरोजगारीचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, काँग्रेस देशातील बेरोजगारीवर काम करणार असल्याचे चिदंबरम म्हणाले. काँग्रेससाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यावेळी सांगितले. ते पुढे बोलातना म्हणाले की, भारत २०३० पर्यंत गरिबीमुक्त करू असे आश्वासन मनमोहन सिंह यांनी यावेळी दिले आहे.

कॉंग्रेस पक्षाने ‘जन आवाज’ असे नाव जाहीरनाम्यास दिले आहे. जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर ‘हम निभाएंगे’ असे आश्वासन देण्यात आले आहे. मंचावर यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, पी. चिदंबरम आणि सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here