पालघर-योगेश चांदेकर

पालघर- जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणी सतत वातावरणात होणारे बदल यामुळे पालघर जिल्ह्यातील कोळंबी  उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे .  येथील कोळंबी ला व्हाईट स्पॉट नावाच्या व्हायरस ची लागन झाली असल्याने कोळंबीच उत्पादन घेणारा शेतकरी हवालदिल झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीलगत वसइ, डहाणू पासून ते गुजरात सीमेलगत असलेल्या झाई पर्यंत हजारो शेतकरी गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील कोळंबीचे उत्पादन घेतात . पालघर जिल्ह्यात हजारो हेक्टरवर कोळंबी  प्रकल्प उभारण्यात आले आहेत . या कोळंबी प्रकल्पांवर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असून चालू वर्षी झालेल्या मुसळधार पाऊस आणि सतत वातावरणात होणारा बदल यामुळे या कोळंबी वर व्हाईट स्पॉट नावाचा वायरस आला असून यामुळे मोठ्या प्रमाणावर कोळंबी मृत  पावत आहे. या व्हायरस मुळे कोळंबीवर सफेद चट्टे येत असून तीन ते चार दिवसात ही कोळंबी किनाऱ्यावर येऊन मृत पावते.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोळंबी प्रकल्प असताना देखील जिल्ह्यात एकही कोळंबी तपासणी लॅब नसल्याने कोळंबी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाच वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here