आनंद पाटिल सहकुटूंब शिर्डीला गेले असल्याने कोणी नसल्याचे पाहून चार गाभण म्हैशींची कत्तल करून मांस चोरी, म्हैशींची किंमत लाखोंचा घरात. वर्षभरातील दुसरी घटना.

तर म्हैशींची कातडी व अनावश्यक भाग कापून तिथेच टाकल्याने परिसरात भिती व तनाव.

पालघर-योगेश चांदेकर

बोईसर – राञीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी कोलवडे गावाच्या आनंद सुरेश पाटिल यांच्या कोलवडे डपिंग ग्राउंड जवळ असलेल्या गोठ्यातील चार म्हैशींची कत्तल करून त्यांचे मास चोरून नेण्याचा प्रकार घडल्याने कोलवडे गावच्या सरपंच श्रीमती प्रतिभा संखे यांचेसह म्हैशींची मालकांसह गावातील ग्रामस्थांनी बोईसर पोलिस मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत व मागील वर्षी ही आशाच प्रकारे याच ठिकाणाहून ५ म्हैशींची कत्तल करून मांस चोरी झाली होती त्या प्रकरणात ही अध्याय कोणताच तपास व कारवाई झालेली नसताना पुन्हा हा प्रकार घडल्याने, संतपत गावकरी, सरपंचांसह मनोज संखे, निखिल पिंपळे म्हैशींचे मालक आनंद पाटिल व गावातील अनेक नागरिकांनी बोईसर पोलिस स्टेशन मध्ये,गुन्हा दाखल करण्यासाठी व कारवाईसाठी जमा झाले होते.

मागील अनेक वर्षांपासून आनंद पाटिल यांचा म्हैशी पालन व दुधाचा व्यवसाय असून मागील वर्षाभरात ही दुसरी घटना घडली असून आता त्यांच्याकडे एकच म्हैस शिल्लक राहिली आहे. तर चोरट्यांनी कत्तल केलेल्या चार ही म्हैशी गाभण असल्याने त्यांचो लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

बोईसर पोलिस स्टेशनला चौकशी व गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here