चैत्यभूमी येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले महामानवाला अभिवादन

0
973

राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती साजरी

मुंबई, दि. 14: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यावेळी उपस्थित होते.

चैत्यभूमी परिसरात मुंबई महानगरपालिकेतर्फे लावण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित सचित्र प्रदर्शनाला राज्यपालांनी भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त अजोय मेहता व सहआयुक्त अश्विनी जोशी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी सभापतींचे सचिव महेंद्र काज, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here