जातीवादी प्रवृत्ती पायलला पैसे देऊन चालवते आहे – केदार काळे

0
1241

पालघर- योगेश चांदेकर

पालघर- शिवाजी महाराजांचा अवमान कॉग्रेस पक्ष सहन करणार नाही. मनुवादी प्रवृत्ती पायल रोहतगीसारख्या अनेक फिल्मी लोकांना ट्विटरद्वारे समाजात विद्वेष पसरविणे, विभूतींवर चिखलफेक करणे, त्यांचे चरित्रहनन करणे व ध्रुवीकरण करण्याची कामे दिली आहेत. त्यातूनच शिवाजी महाराजांचा अवमान करण्यापर्यंत पायलची मजल गेली, असा आरोप पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केदार काळे यांनी केला आहे.
पायल रोहतगीने शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानजनक ट्विटवर केदार काळे यांनी संताप व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, ज्या विचारधारेची पायल रोहतगी समर्थक आहे. ज्या विचारधारेची संघटना पायल रोहतगीला पैसे देऊन चालवते आहे त्याच विचारधारेने छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या राज्याभिषेकाला नकार दिला होता. त्याच विचारधारेचे लोक आता समाजात विद्वेष पसरवण्यासाठी पायल रोहतगीसारख्या व्यक्तींचा वापर करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत. शिवरायांचा अवमान कधीही सहन केला जाणार नाही, असा इशाराही केदार काळे यांनी दिला आहे.

कोब्रा पोस्टने मध्यंतरी स्टिंग ऑपरेशन केले होते. या स्टिंगमध्ये पैसे घेऊन ट्विट करू असे अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी म्हटले होते, त्यात पायल रोहतगीही होती, असे जिल्हा अध्यक्ष काळे म्हणाले.
पायल रोहतगी या अर्धवट बाईने याआधी राजा राममोहन रॉय यांच्याबद्दलही असेच अवमानकारक ट्विट केले होते. सतीप्रथेची भलामणही तीने केली होती. आता या बाईची मजल छत्रपतींबद्दल चुकीची वक्तव्ये करण्यापर्यंत गेली आहे. महापुरुषांबद्दल गरळ ओकणाऱ्या पायल रोहतगी सारख्यांचा प्रवृत्तीचा पालघर जिल्हा कॉग्रेस कमिटी जाहीर निषेध करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here