“टमरेल” मोर्चा : तलासरी तहसील कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचं हटके आंदोलन

0
1509

पालघर-योगेश चांदेकर

पालघर- तलासरी तहसीलदार कार्यालयावर सौचालय आणि विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला . पंचायत समिती सर्वे नुसार तालुक्यात 24500 कुटूंबाला स्वच्छ भारत अभियान व निर्मळ ग्राम योजने अंतर्गत शौचालयाचा लाभ दिला पाहिजे होता परंतू पंचायत समिती प्रत्यक्ष 4हजार कुटुंबाला लाभ देण्यात आला व हागणदारी पुरस्कार शासनाकडून मिळवून घेतला. तसेच तालुक्यात गाव /पाड्यांना वीज जोडणी करावी व सौभाग योजनेतून जे मीटर दिले होते त्यांना बिल आले होते त्याची जोडणी न करता वीज बिलं देण्यात आली आहेत. रोजगार हमीची कामं, जातीच्या दाखल्याचा प्रश्न व अशा इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

संघटनेच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार तलासरी यांना देण्यात आले. तालुक्यात संपावर गेलेल्या ग्रामसेवकावर कार्यवाही करवी त्या संदर्भात जिल्हा कडे कार्यवाही साठी प्रस्ताव पाठवणार .तालुक्यात जातीच्या दाखल्याचे कॅम्प घेणार त्या रेशन कार्डच्या बाबतीत नवीन रेशन कार्ड दिले आहेत. त्या नवीन रेशनकार्डवरती प्राधान्य कुटूंबाचे शिक्के मारून देणार आहेत. ह्या बाबतीत चर्चा झाली असता दि.१८/०९/२०१९ रोजी पंचायत समितीची कमिटी व तालुक्यातील पदाधिकारी तपासणीसाठी जाणार आहे. व उर्वरित शौचालयसाठी अर्ज करा असे सांगण्यात आले.

या शिष्टमंडळामध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली.या मोर्चासाठी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा कार्याध्यक्ष केशव नानकर जि. अध्यक्ष सुरेश रिंजड उपाध्यक्ष रवी चौधरी जि सचिव रुपेश डोले जि युवक उपाध्यक्ष सुजित घरत उमबरकर सचिव अनिस सुतार , सुनीता ताई वि स्वप्नील वाघ यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच हा मोर्चा यशस्वी कण्यासाठी सैना फरारा, रंजना हाडल, अनिल रमेश राजेश रामदास व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन यशस्वी करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here