पालघर-योगेश चांदेकर

पालघर-डहाणूचे भौगोलिक मानांकन म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिकू या फळाची लागवड करणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांना विमा कंपनी आणि
राष्ट्रीयीकृत बँकांचा हलगर्जीपणामुळे विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील जवळपास ४० चिकू बागायतदारांना पिक विमा योजनेपासुन वंचित राहावे लागत असल्याने बागायत दार चिंतेत आहेत. बँकेकडून पोर्टलमध्ये शेतकऱ्यांची माहिती न भरण्यात आल्याने त्याचा फटका बसल्याची प्रतिक्रीया बागायतदार शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

चिकू फळपिकाला पंतप्रधान पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत कमाल दहा दिवस ९० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास शंभर टक्के व किमान पाच दिवस राहिल्यास ५० टक्के नुकसानभरपाई विमा कंपनीने द्यावी, अशा अटीवर २०१८ मधील खरीप हंगामात टाटा एआयजी या विमा कंपनीला पीक विम्यासाठी जबाबदारी देण्यात आली होती. ३० जूनपूर्वी बागायतदारांनी पाच टक्के रक्‍कम जमा करून विम्याचे अर्ज दाखल करावेत, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर डहाणू तालुक्यातील ३२ बागायतदारांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या डहाणू शाखेत प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार बागायतदारांच्या खात्यातून २,६४,९९४ रुपयांची रक्‍कम विमा हप्ता म्हणून वसूल करण्यात आली. खरीप हंगामात आद्रतेचे प्रमाण जास्त प्रमाणात राहिल्याने बागायतदाराला विम्याची रक्‍कम देणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार अनेक बागायतदारांना पीक विम्याचा लाभ मिळाला. मात्र, डहाणू येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या
हलगर्जीपणामुळे २२ बागायतदार विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. आपल्या हक्‍्कचे पैसे मिळावेत म्हणून संबंधित बागायतदारांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा डहाणू, टाटा विमा कंपनी आणि कृषी विभागप्रमुख यांच्याशी पत्रव्यवहार केला. मात्र, समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची बागायतदारांची तक्रार आहे.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत डहाणू तालुक्यात बँक आॅफ बडोदा,बँक आॅफ इंडीया ,न्यू इंडीया इन्शिरन्स आदि बँकध्ये शेतकऱ्यांची रितसर प्रीमियम रक्कम भरली जात आहे. २०१८ मधील खरीप हंगामातील २२, तर २०१६ मधील खरीप हंगामातील १४ बागायतदार विमा योजनेची रक्‍कम मिळविण्यासाठी
बँक शाखा, कृषी कार्यालय आणि विमा कंपन्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारत‍ात मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.

कोट:

१.” बँक ऑफ महाराष्ट्र डहाणू शाखेतून ३२ पैकी उर्वरित २२बागायतदारांचा प्रश्न सोडविण्यासाठी टाटा विमा कंपनीकडे पत्रव्यवहार केला आहे. “- अभय पाटील, व्यवस्थापक बँक आॅफ महाराष्ट्र

२.”याबाबत अधिक माहिती घेतली असता शेतकऱ्यांच्या
खात्यातून विम्याचा हप्ता वजा झाला आहे. मात्र पोर्टलमध्ये शेतकर्यांची माहीति वेळेत अपलोड न झाल्याने त्याचा फटका शेतकर्यांना बसला आहे” — भाऊराव पाटील,
बागायतदार, डहाणू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here