पालघर-योगेश चांदेकर

पालघर-डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थे तर्फे जुने वापरण्यास योग्य कपडे गरिबांसाठी दान करण्याचे आव्हान “नवरात्रोत्सव” दरम्यान नागरिकांना करण्यात आले होते.
वैतरणा विभागातील कसराळी, तलावपाडा, फणसपाडा इथल्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत टेम्पो भरेल इतके कपडे दान केले होते.
ह्या कपड्यांसोबत संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना ५०० वह्या व सदस्य बाळा पाटील यांच्या कडून २५० पेन तसेच स्टेशन कमिटीच्या वतीने मुलांसाठी बिस्किटे, चॉकलेट इत्यादी सामानाचे आज जव्हार येथून १० किलोमीटर जंगलात असलेल्या “`आयरे चोंडीपाडा“` ह्या अतिशय दुर्गम भागात तीन-चार गावातील लोकांना एकत्र करून साहित्य वाटप करण्यात आले.


ह्या उपक्रमासाठी चोंडीपाडा शाळेतील मुख्याध्यापक श्री. नामदेव भोये सर यांनी सर्वांना एकत्र करण्यासोबत संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले व संस्थेने केलेल्या मदती बाबत आभार व्यक्त केले.
त्याठिकाणी उपस्थित पाहुणे (लोककवी) श्री. पांडुरंग मौळी यांनी सर्व नागरिकांसमोर, “देऊया गती विकासाला” ही त्यांची कविता वाचून दाखवली सोबत त्याचे उदाहरण पटवून दिले.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सतिश गावड, सहसल्लागार श्री. सखाराम पाटील ह्यांनी तिथली परिस्थिती पाहून ही गावे निवडली होती. ज्या गावात ST बस पोहचू शकत नाही अशा अतिशय दुर्गम भागातील नागरिकांची काय परिस्थिती असेल हे वेगळे सांगायला नको.
हा उपक्रम राबविण्यासाठी वैतरणा स्टेशन कमिटीच्या सर्व सदस्यांनी स्वखर्चाने पुढाकार घेत मोलाचे सहकार्य केले, स्टेशन कमिटी अध्यक्ष सत्यवान सापने, उपाध्यक्ष हितेश किणी, सदस्य मंगेश पाटील, नरेन्द्र पाटील, प्रदीप पाटील, लक्ष्मण वैती, गिरीधर टोकरे, महेश हाडल, नरेश पाडेकर, साई पाटील, आनंद नाईक, जितेश गावड, प्रितम किणी, यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here