धक्कादायक : डहाणूतील ८ पास विद्यार्थ्यांना अद्याप नववीच्या वर्गात प्रवेश नाही.!

यावर तोडगा काढण्याचे आ. अमित घोडांचे आश्वासन

0
1416

पालघर-योगेश चांदेकर

प्रचंड गाजावाजा करून सार्वशिक्षण अभियानाचे ढोल बजावणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाला छेद देणारी घटना डहाणू तालुक्यात घडली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षी शालेय अभ्यासक्रम सुरू होण्यास अवघे पाच ते सहा दिवस कालावधी राहिले आहे. मात्र वानगावच्या तसेच कासाच्या आदिवासी ग्रामीण भागातील मुलामुलींना ९ वी वर्गासाठी प्रवेश मिळाला नसल्याने सदर विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज पालघर आ. अमित घोडा यांची भेट घेऊन मुलांच्या प्रवेशाबद्दलची समस्या सोडविण्याचे आवाहन करून त्याबद्दल एक निवेदन घोडा यांना दिले आहे.
यावर आ.अमित घोडा यांनी या गंभीर विषयावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आदेश जिल्हा गटशिक्षणाधिकारी यांना दूरध्वनी वरून दिले आहेत.
यावेळी आ.घोडा यांच्या समवेत शिवसेना माजी डहाणू तालूका प्रमुख संतोष वझे, विभागीय उपतालुकाप्रमुख अजित बारी,
भरत बारी, काशिनाथ जाधव, कृष्णा बसवत, मधू चौधरी, त्रिंबक अवचार, बाबू घुटे, विजय घुटे, देवेन्द्र बसवत, निवास वरठा व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here