पंढरपुरात आमदार भारत भालकेंची पोलिसांना अरेरावी, भालकेंवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

0
1350

पंढरपूर (१४ मार्च) : विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्यावरून आज कॉंगेसचे आमदार भारत भालके आणि पोलिसांमध्ये चांगलीच वादावादी झाली. यावेळी आमदार भारत भालकेंनी पोलिस निरीक्षक विश्वास साळुखे यांना अरेरावी करत पोलिसांवर दाबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अतिक्रमणा विरोधात सुरू केलेली  कारवाई थांबवावी अशी मागणी करत आमदार भारत भालकेनी पोलिस अधिकार्यांशी हुज्जत घातली.

अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पोलिसांनी हाय आलर्ट जारी केला आहे. सुरक्षेचा भाग म्हणून मंदिर पोलिसांनी मंदिर परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यास सुरवात केली आहे. मात्र पोलिसांच्या या कारवाईला खुद्द आमदारांनीच विरोध करत पोलिस अधिकार्यांशी हुज्जत घातली. यावेळी आमदार समर्थक कार्यकर्ते व पोलिसांमध्येही वादावादी झाली. हा सगळा गोंधळ संत नामदेव पायरीजवळ सुरू असताना बघ्याची मोठी गर्दी जमली होती. मागील आठ दिवसांपूर्वीही मंगळवेढा येथे सामाजिक कार्यकर्ते संतोष माने याला ही आमदार भालकेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. दिवसेंदिवस आमदार महोदय आणि त्यांच्या कार्यर्त्यांची गुंडगिरी वाढू लागल्याची बघ्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे पहायला मिळाले. या प्रकरणी आमदार भालके यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

By mumbaienews.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here