पालघर जि.प. च्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

सेनेचे सदस्या भारती कामडी यांच्या नावाची चर्चा

0
1096

पालघर – योगेश चांदेकर : 

पालघर जिल्हा परीषदेच्या झालेल्या निवडणूकीत शिवसेना हा नबर एकचा पक्ष ठरला असून या खालोखाल राष्ट्रवादी आहे. यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी याठीकाणी होवून सेना राष्ट्रवादीची सत्ता बसेल यामध्ये अजिबात दुमत नाही .मात्र आता सत्तेचा नेमका कोणता फॉर्म्युला ठरणार हे गुलदस्त्यात असले तरी संख्याबळानुसार पहीला अध्यक्ष शिवसेनेचा होणार अस राजकीय चित्र आहे.

पालघर झेडपीचे आरक्षण महीला अनुसूचित जमाती अस असल्याने पुन्हा आदिवासी महीलेच्या हातात जिल्ह्याचे नेतृत्व जाणार आहे. मात्र आता अध्यक्षपदाची माळ नेमक्या कुणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न उभा राहीला असताना आदिवासी भागात सेनेचे अस्तित्व ठेवलेल्या आणि अटीतटीच्या लढतीत निवडून आलेल्या तलावली गणाच्या नवनिर्वाचित सदस्या भारती भरत कामडी यांच्या नावाची चर्चा जोर धरत असून ग्रामीण शिवसैनिकांनीही त्यांना अध्यक्ष पद मिळावे अशी मागणी केलेली आहे. भारती कामडी या उच्च शिक्षित असुन गेल्या झेडपी निवडणुकीत वाडा तालुक्यातील मांडा गटात जिल्हा परिषद सदस्या निवडुन आल्या होत्या. याशिवाय नुकताच झालेल्या झेडपीत तलावळी गटात सेनेचे अस्तित्व नसतानाही सदस्य निवडून येऊन मोठी ताकद दाखवली आहे. याशिवाय विक्रमगड तालुक्यातही सेनेची पडझड झाली. यामुळे जव्हार, मोखाडा, विक्रमगड ,भागात सेनेच्या वाढीसाठी कामडी यांना झेडपीचे अध्यक्ष करणे गरजेचे असल्याचे मत याभागातील शिवसैनिकांनी मांडले आहेत. यामुळे आता पालघर जिल्हा परीषदेचा नवा अध्यक्ष कोण या प्रश्नाबरोबरच वाडा भागाला जिल्ह्याचे नेतृत्व मिळू शकेल अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.जव्हार ,विक्रमगड, मोखाडा व वाडा या भागाचा विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर अतिदुर्गम भागातील सदस्यांना जिल्हा परिषद अध्यक्षाची धुरा सोपविण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here