पालघर-योगेश चांदेकर

आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. यामधे राज्यातील बहुतांश उमेदवारांची खासगी मालमत्ता कोट्यवधींच्या घरात आहे मात्र शिवसेना पक्षाचे पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार श्रीनिवास वनगा हे याला अपवाद आहेत.

मालमत्तेच्या बाबतीत ते जर बघायला गेले तर ते सर्वांत गरीब आमदार आहेत. त्यांच्याकडे 9 लाख सत्तर हजार 230 वारस प्राप्त मालमत्ता 34 लाख 60 हजार 333 इतकी आहे

तर बैंक वित्तीय कर्ज 11 लाख 21 हजार 385 आहे त्यात चारचाकी (1) 6 लाख 85 हजार 498

सोने चांदी बाजार मूल्यानुसार 20 ग्रॅम72 हजार तर पत्नीकड़े 30 ग्रॅम बाजारमूल्य 1 लाख 8 हजार याचप्रमाने पत्नी सुमन यांची जंगम मालमत्ता 8 लाख 46 हजार 123 रुपये त्यात श्रीनिवास यांच्या सौभाग्यवती सुमन यांची स्थावर मालमत्ता 2 लाख 9 हजार इतकी असून त्यात सुमन यांचे बैंक व वित्तीय कर्ज 11 लाख 57 हजार 314 रुपये आहेत यात पालघरचे आमदार श्रीनिवास यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही.

अतिशय गरीब कुटुंबात तलासरी तालुक्यातील कवाड़ा येथे जन्माला आलेले श्रीनिवास याना आई-वडिलांनी मोलमजुरी करुन शिकवले श्रीनिवास यांचे वडील दिवंगत खासदार चिंतामन वनगा हे भाजपमधून 3 वेळा खासदार 1 वेळा आमदार होते. श्रीनिवास यांचे वडील आमदार खासदार असतानाही शेती मधे स्वता काम करत त्यांच्या पावलावर पाउल ठेवत वडिलांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच धेय ठेऊन श्रीनिवास यानी वडिलांच्या निधनानंतर सेनेत प्रवेश केला अंर्तगत पक्षाच्या वादातुन श्रीनिवास यानी भाजपला सोडचिठी देत शिवसेनेतून निवडणूक लढवली व ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले

दरम्यान सत्तेचे समीकरण फक्त पैसा नसून यामधे सामाजिक बांधीलकी एकोपा संघर्ष जनहिताचे प्रश्न हे लक्षात घेतले तर जनता प्रभावित होऊन न्याय देते असे श्रीनिवास यांचे म्हणणे आहे याच सर्व श्रेय ते सर्व कार्यकर्त्यांना देत असून माझ्या पाठीशी जनता ठामपणे उभे राहिल्याने मला है यश आल्याचे त्यानी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here