मोईज शेख यांची काँग्रेस सरचिटणीस पदी निवड

0
1278

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-डहाणू काँग्रेस चे माजी शहर अध्यक्ष मोईज शेख यांची पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी वर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील यांनी केली. डहाणू पालघर परिसरात काँग्रेस जिवंत ठेवण्यात मोईज शेख यांचा सिंहाचा वाटा आहे.अत्यन्त प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस चा झेंडा कसा फडकत राहील याची वेळोवेळी त्यांनी दक्षता घेतली. तसेच डहाणू नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढवून डहाणूत काँग्रेसचा मतदार जागृत केला.वेळोवेळी मोर्चे, आंदोलने काढून या बीजेपी सरकार विरोधात वातावरण तयार केले, नेहमी पक्ष व पक्ष श्रेष्ठीं शी विश्वासपूर्ण राहून पक्षासाठी भरीव कार्य केल्या मुळे त्यांची निवड या महत्त्वाच्या पदावर करणेत आली असे विश्वसनीय रित्या कळते.

शिवाय त्यांच्या कडे जिल्हा कार्यालयाचा कार्यालय प्रमुख हा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे.त्यांचा प्रभावशाली लेखणीचा व वक्तृत्वाचा काँग्रेसला येणाऱ्या काळात निश्चितच फायदा होईल.उच्च शिक्षित सरचिटणीस लाभल्याने जिल्हा काँग्रेस मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here