पालघर-योगेश चांदेकर

पालघर- महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते.
महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने या विशेष स्पर्धेचे आयोजन केले होते.
महिला हि नोकरी करणारी असो किंवा घरदार सांभाळणारी असो.
स्वंयपाक हा तीच्या आवडीचा विषय,आवडीचे कौतुक होणे आणि स्वंयपाक कलेचा वारसा अविरत चालू ठेवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
या स्पर्धेत स्पर्धकांना कोणताही एक गोड पदार्थ स्वता: बनवून आणायला सांगितलेला होता.
२८ महिलांनी सहभाग नोंदवत उत्तम व चविष्ट पदार्थ बनवून आणले होते.


परिक्षकांनी पदार्थ बनविण्याची पद्धत,कृती व साहित्य तसेच सादरीकरण ईत्यादि बाबत निरिक्षण केले.
परिक्षक म्हणून अनुभवी सौ.राधा पामाळे व सौ.शितल वेदपाठक त्यांच्यासोबत मंडळाचे परिक्षक म्हणून श्री.सुनिल हाटकर,राजश्री हाटकर यांनी काम पाहिले.

सानिका सत्येन पाटील यांच्या “माव्याची व कमळफुले” या पाककृतीस प्रथम पारितोषिक मिळाले तर सौ.पुष्पा मनोहर पाटील यांच्या “गाजर हलवा” पाककृतीस व्दितीय क्रमांक मिळाला.रूमाना शेख यांच्या पाककृतीने तृतीय क्रमांक पटकावला.
सौ.स्नेहा हाटकर व लता चौहाण यांच्या उपवासाचे लाडू आणि चुर्मा लाडू यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
मंडळातर्फे सर्व सहभागी स्पर्धकांचे व परिक्षकांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here