पालघर-योगेश चांदेकर

पालघर- युवक मित्र मंडळ केळवे आयोजित, पाटकर-वर्दे महाविद्यालय, गोरेगाव निर्मित, ज्ञानदा खोत व प्रथमेश पवार लिखित एकांकिका “राशनकार्ड” तसेच लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत व्दितीय पारितोषिक विजेती व आत्तापर्यंत ५५ पारितोषिके विजेती एकांकिका “पैठणी” अशा या दोन दर्जेदार एकांकिचेचे केळव्यात सादरीकरण करण्यात आले.
सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनातील काही निवडक क्षण अचूक टिपुन उत्तम सादरीकरण हे या नाटिकांचे वैशिष्ट्य.
बदलती कुटुंबव्यवस्था आणि बदलत जाणारी नाती, नात्यांमधील दुरावा आणि आपलेपणाचा ओलावा यावर प्रकाश टाकणारी २०१९ च्या युवा महोत्सवातील बक्षीस पात्र एकांकिका “राशनकार्ड” तर एका मध्यमवर्गीय कुटुंबांचे वास्तववादी चित्रण म्हणजे “पैठणी”  मध्यमवर्गीय म्हणून आपण अनेक स्वप्न उराशी बाळगत असतो आणि ती पुर्ण करण्यासाठी केवीलवाणी धडपड सुद्धा करीत असतो, अशाच एका मध्यमवर्गीय स्त्री च्या स्वप्नाचा रंजक प्रवास ह्या एकांकिकेत मांडलेला आहे.”पैठणी”ने संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या मानाच्या स्पर्धा जिंकून ५५ बक्षिसं मिळवलेली आहेत.
केळवे-माहिम परिसराला नाटकांची फार जुनी पार्श्वभुमी आहे, केळवे-माहिम परिसरातुन विविध एकांकिका राज्यनाट्य स्पर्धेसाठी पात्र होत आलेल्या आहेत.


म्हणूनच युवक मित्र मंडळ केळवेतर्फे कला रसिकांसाठी विशेष नाटिकांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथमेश पवार यांचे लेखन, दिपेश मोरे यांचे संगीत, अमित घाडीगावकर यांची प्रकाश योजना, युवक मित्र मंडळाचा रंगमंच आणि पाटकर-वर्दे महाविद्यालयाच्या कलाकारांचा अभिनय. उत्तम आयोजन, सुंदर सादरीकरण आणि मायबाप प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here