पालघर- योगेश चांदेकर:

विनाशकारी वाढवण बंदर प्रकल्पा विरोधाची धार दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. प्रस्तावित बंदर प्रकल्पामुळे डहाणू परिसरातील स्थानिक मासेमार, शेतकरी, डाय मेकर, आदिवासी या सर्व भूमिपुत्रांना नुकसान होणार होते. या सर्व स्थानिकांना ह्या विनाशकारी प्रकल्पा पासून, नद्या खाडे समुद्र नासवणाऱ्या केमिकल कारखान्यां पासून डहाणू पर्यावरण प्राधिकरणाने आजतागायत अभय दिले होतो. अगदी 2017 मधे देखील डहाणू प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी निसर्ग व स्थानिकांच्या बाजूने राहत बंदर प्रकल्प परतवून लावला होता.

परंतु त्यांच्या स्वर्गवासा नंतर प्रकल्पाने पुन्हा डोके वर काढले आहे. तसेच या वेळी सत्ताधारी पक्ष प्राधिकरणाच बरखास्त करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि बंदर प्रकल्प पुन्हा आणायचा प्रयत्न सुरू आहे. याचा स्थानीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आजवर सेना भाजप चा गड असलेल्या मच्छीमार गावांमधे या वेळी एक मताने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. डहाणू खाडी या गावाने आज ह्या गोष्टीची पहल करून हजारोच्या संख्येने हा निर्णय घेतला. तसेच वरोर, वाढवण, तिघरे पाडा, या गावामध्ये देखील वातावरण तापले असून डहाणू खाडी पाठोपाठ ह्या गावामध्ये देखील लवकरच बहिष्कार घेण्याची तयारी दिसत आहे.

दरम्यान सरकार कोणाचेही आले तरी नेहमी आमच्या घरांवर, आमच्या उपजीविकेचे साधन असलेल्या नद्या खड्यांवर नेहमी प्रकल्पाची टांगती तलवार असते त्या मुळे आम्ही कोणालाच मतदान करणार नाही असा ठाम निर्णय गावकरी लोकांनी घेतला आम्हाला विनाशकारी वाढवण बंदर प्रकल्प नको. आणि आम्हाला डहाणू पर्यावरण प्राधिकरण शाबूत हवे ही गावकऱ्यांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here