पालघर-योगेश चांदेकर

पालघर- वाणगाव मध्ये खाजगी सावकराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचे लोण आता पालघर जिल्यातील वाणगाव या लहानश्या गावा मध्ये येऊन पोचले आहे सरकारने अवैध सावकारीचा कायमचा बीमोड करण्यासाठी राज्य शासनाने जुन्या सावकारी कायद्यात आमूलाग्र बदल करून 2014 मध्ये नवीन कायदा मंजूर केला, मात्र धनदांडगे, राजकीय वरदहस्त व गुंडगिरीच्या जोरावर व्याजाने पैसे देऊन काहींना वेठीस धरत असून अवैध सावकारीतून करोडो रुपयांची माया गोळा करीत आहेत .


वाणगाव मधील शेकडो लोकांनी वाणगाव पोलिस स्टेशन व सहकारी स्वंस्था डहाणू यांच्या कड़े लेखी तक्ररारी अर्ज दाखल  केला आहे. सदर खाजगी सावकार हा शेतकऱ्याचा व छोटा धंधा करणाऱ्या गरीब व गरजू लोकांच्या अडचणींचा फायदा उठवून अवैध खाजगी सावकार दिनेश त्रिवेदी (बबलू)या ने 20 ते 40 टक्याच्या भस्मासुर सारख्या व्याजावर  शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत या सावकाराने व्याजाने पैसे देते वेळी शेतकरी व छोटे धंध्यावाल्याच्या जमीनीचे व सनदीकाचे पेपर गहाण ठेऊन घेतो  व काहींचे अगोदरच कोऱ्या  चेकवर सह्या किंवा जमीन, घरे, वाहने लिहून घेतो जर व्याजाची रक्कम थकल्यास सदर वेक्ती जबरदस्तीने मालमता ताब्यात घेतो.
हे व्याजाचे दर डोळे पांढरे करणारे आहेत. परंतु, पर्याय नसल्यामुळे अनेक जण या अवैध सावकारा कडून धंदा करण्यासाठी पैसे घेत आहेत. अवैध सावकारांकडून घेतलेल्या रकमेच्या व्याजाचे आकडे दिवसेंदिवस फुगत जातात, मग हे पैसे सावकाराला परत करणे कठीण होते, या सावकराकडून वाणगाव येतील राऊत या दोन शेतकऱ्यांनी 6 लाख रुपये कर्ज घेतले होते त्याची रक्कम त्यांनी आता पर्यंत 70 ते 75 लाख रुपये भरली आहे परंतु येवडी मोठी रक्कम भरून ही सदर अवैध खाजगी सावकार त्रिवेदी हा या शेतकऱ्यांकडून सहा लाखाची मागणी करत आहे सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने घेतलेले पैसे परत करून ही आजून जास्त रक्कमेची मागणी करत राहतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे या सावकाराकडून शिवीगाळ तर केली जातेच. शिवाय, संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन धमक्या दिल्या जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. पंरतु अनेक जण भीतीपोटी पोलिसात तक्रार देण्याचे धाडस दाखवत नाहीत. शिवाय अवैध सावकार घरी जाऊन जमिनी व घरे नावावर करून देण्याची धमकी देत आहेत. असे म्हणणे वाणगाव मधील छोट्या व्यवसायिकांचे आहे.
मागील काही वर्षांपासून या भागात दिनेश त्रिवेदी या अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून घेतलेले पैसे परत फेड करून ही जास्त रक्कम मागतो म्हणून अनेक जण कायमचे फरार झाले आहेत, बहुतेक जणांनी मुद्दल व व्याज देऊनही य खासगी अवैध सावकरांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी घर खाली करायला लावणे, दुचाकी, चारचाकी वाहने ताब्यात घेणे, जमीन लिहून घेणे अशा घटना घडल्या आहेत. एकंदरीत सावकार जोमात  आणि कर्जदार कोमात अशी परिस्थिती वाणगाव परिसरात आहे.

1 – (प्रमोद दुबला – ग्रामस्थ वाणगाव) -:
वाणगाव परिसरात चार जण अवैध पद्धतीने बेकायदेशीर खाजगी सावकारी धंदा करत आसून त्यांनी सामान्य शेतकरी व छोट्या व्यवसायिकांना 22 ते 40 टक्यांनी कर्ज दिले घेतलेले पैसे देऊन ही जास्त रक्कम खाजगी सावकार दमदाटी करून मागत आहेत त्यामुळे कर्जादार आत्महत्या सारखे पाऊल उचलू शकतात त्यासाठी पोलीस अधीक्षक पालघर व सहाय्यक निबंधक डहाणू यांनी तात्काळ चौकशी करून गुन्हा नोंद करावा

२- (राकेश पगारे – सहायक पोलिस निरीक्षक, वानगाव पोलिस स्टेशन) -:
वानगाव पोलिस स्टेशन मध्ये सदर सावकारी विषया बाबत तक्ररारी अर्ज धाकल झाले आहेत त्या अर्जाची चौकशी सुरु आसुंन या मध्ये जर कोणी दोषी आढळले तर योग्य ती कायदेशीर कार्रवाई केली जाईल

३ – (अजय गुजराथी – सहाय्यक निबंधक, डहाणू ) -:
आमच्या कार्यालया मध्ये वाणगाव पोलीस स्टेशन मधून आम्हला या बाबत पत्र भेटले आहे सदर पीडित तक्ररार दारांनी आमच्या डहाणू येतील सहाय्यक निबंधक सहकारी स्वंस्था या कार्यालया मध्ये प्रतक्ष येऊन तक्ररार धाकल करावी जर कोणी बेकायदेशीर रित्या खाजगी सरावकरी कोणी करत असेल तर त्याच्या विरुद्ध तक्ररार आली तर आम्ही योग्य ती तात्काळ कायदेशीर कारवाई करू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here