पालघर-योगेश चांदेकर

पालघर-विरार पूर्व कोपरी परिसरातील एका विस वर्ष जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे.मंगळवारी रात्री आठ वाजता हि घटना घडली आहे.
विरार पुर्व कोपरी येथील नित्यानंद धाम बिल्डिंगचा ‘सी’ वींगमध्ये चौथ्या मजल्यावरील सज्जा व टेरेसचा भाग अचानक कोसळला.या बइमारतीत 80 च्या वर कुटूंब राहतात.कोसळलेल्या ढिगा-याखाली भूमी विनोद पाटील (वय 5) हि बालीका अडकल्यामुळे तीची सुटका करण्यासाठी परिसरातील नागरीक मदतीसाठी धावले.वसई विरार अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र बालीकेचा ढिगा-याखाली दबल्याने दुदैवी मूत्यू झाला.सदर इमारतीमधील रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

सदर इमारत धोकादायक अवस्थेत असताना टेरेसवर पत्र्याची शेड उभारण्यात आलेली होती.हि शेड स्लॅबसोबत कोसळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here