शरद पाटील यांच्या हस्ते सावरखांड येथे गावदेवी मंदिराचे भुमीपुजन

0
1195

पालघर-योगेश चांदेकर :

पालघर-वाडा तालुक्यातील सावरखांड या गावातील गावदेवी मंदीराचे भूमिपुजन आज शुक्रवार दि. १० जानेवारी २०२० रोजी शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद यशवंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी गावातील ग्रामस्थ व परीसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकताच झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार शरद पाटील यांच्या थोडक्या मतांनी निसटता पराभव झाला आहे. तरीही ग्रामस्थांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. महिलांनी ओवाळून त्यांना पुढील ‘तुम्हीच आमचे लोकप्रतिनिधी’ असे सांगुन विश्वास दाखवला.


यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना शरद पाटील यांनी सांगितले की, ‘जय-पराजय होतच असतात. मात्र ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केले आहे त्यांना मी जन्मभर विसरणार नाही. तसेच निवडणूकीमध्ये दिलेल्या आश्वासनांचे पालन करून मतदार संघातील सर्व समस्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.’
‌‌यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे नगरसेवक संदिप गणोरे, प्रमुख कार्यकर्ते गजानन म्हसकर, अरुण वेखंडे, ज्ञानेश्वर वेखंडे, गणेश भोईर, सुशांत पाटील, राजु पाटील, हरेश चौधरी, प्रवीण देशमुख, संदीप देशमुख, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक शुभम देशमुख यांनी केले तर आभार प्रशांत धुम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here