पालघर-योगेश चांदेकर

पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढी ,सफाले(पालघर)तर्फे धर्मदाय निधीतून कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्तानसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता रुपये २५००० चा धनादेश पालघरचे उपजिल्हाधिकारी महाजन यांना देण्यात आला.

दरम्यान यावेळी पतपेढीचे ल अध्यक्ष संतोष. पावडे, कार्यवाह के.डी.पाटील, संचालक रवींद्र ठाकुर उपस्थित होते.महाराष्ट्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या या पतपेढी चे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असुन गतवर्षी डहाणू, तलासरी भुकंपग्रस्त गावातील गरजुना ब्लँकेटचे वाटप केले होते. पतपेढी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविते. शासनाच्या विविध कार्यक्रमासाठी मोफत शिक्षक पतपेढी भवन उपलब्ध करुन दिले जाते. शिक्षकांचे जीवनमान उचावण्यासाठी पतपेढी योगदान महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here