पालघर-योगेश चांदेकर

पालघर-विद्यार्थी दशे पासूनच अनेक सामाजिक चळवळीतून आपला ठसा उमटवून विविध पातळीवर समाजाचे नेतृत्व करणारे जयेंद्र दुबळा नावाचे युवा नेतृत्व परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.शासकीय नोकरीतून राजीनामा देत समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला.शिक्षण,रोजगार आरोग्य या मूलभूत सोयी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा नवीन संकल्प घेऊन पूर्ण जनमताचा आदर ठेवत त्यांनी शिवसेना या पक्षातर्फे उमेदवारी नोंदविली.

केंद्र शासनाने पुरस्कृत केलेले वाढवण हे बंदर होऊ घातले आहे.याचा थेट परिणाम वाढवण या गावासोबत परिसरातील गावांनासुद्धा होणार आहे आणि ही बाब केंद्र सरकार जाणून बुजून लोकापासून लपवीत आहे. झाई पासून ते सातपाटी पर्यंतचा मच्छिमारी साठी प्रसिध्द असलेला पट्टा पूर्णपणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.परिसरातील गावच्या गावे संपून जाण्याच्या मार्गावर असून येथील मच्छीमार भिकेला लागणार कारण त्याची हक्काची जमीन आणि रोजगार हिरावला जाणार आहे.

या विनाशकारी बंदराच्या विरोधातील लढा अधिक तीव्र करून येथील स्थानिक मच्छीमार ,भूमिपुत्र यांचे सहकार्य मिळवत हा प्रकल्प पळवून लावण्यासाठी पालघर जिल्ह्यातील धाकटी डहाणू या जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे युवा आणि लोकप्रिय उमेदवार जयेंद्र दुबळा यांनी कंबर कसली असून संपूर्ण जनमत आज त्यांच्या पाठीशी उभे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here