शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आदर करण्याचे अजिंक्य रहाणेचं आवाहन

0
1246

लोकशाही.न्यूज : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने शेतकऱ्यांचा आदर करण्याचे आवाहन एका व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे. त्याने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून अजिंक्य रहाणेची शेतकऱ्यांप्रती असलेली आत्मियता आणि सामाजिक भान दिसून येत आहे.

व्हिडीओ मध्ये अजिंक्य रहाणे एका शेतकऱ्याच्या शेतात उभा असल्याचे दिसत आहे. यावेळी त्याने शेतकऱ्यास धन्यवाद देत आपण जे खातो ते या शेतकऱ्यांमुळेच, त्यामुळे शेतकऱ्यांचा आदर करा असे आवाहन त्याने केले आहे. जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा शेतकऱ्यांना विसरू नका, त्यांचे योगदान आपल्या आयुष्यात खूप मोलाचे असल्याचेही अजिंक्यने यावेळी म्हणटले आहे. अजिंक्यने केलेल्या या व्हिडीओ पोस्ट मधून त्याची आत्मियता दिसून येत असल्याने त्याचे सोशल मिडीयावर कौतुक केले जात आहे.

By mumbaienews.com

व्हीडीओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here