बाळाराम भोईर यांच्या नावाने आलेल्या बातमीचे श्रमजीवी संघटनेकडून खंडन.

उमेदवारांच्या नावाची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही-बाळाराम भोईर.

पालघर-योगेश चांदेकर:

पालघर- निवडणूक जवळ येत असताना आता चर्चा, फेक पोस्ट आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा ओघ वाढला आहे. श्रमजीवी संघटनेने परवा झालेल्या बैठकीत “संघटनेचा कोणालाही तूर्तास पाठिंबा नाही” असे स्पष्ट केले होते. आणि वेळ आल्यास स्वबळावर उमेदवार उभे करू असेही सांगितले होते हे सत्य आहे मात्र आज एका वृत्तपत्रात संघटनेच्या उमेदवार यादीबाबत एक दिशाभूल करणारी बातमी आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी ही श्रमजीवी संघटनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केल्याचे या बतमीमध्ये नमूद केले आहे, मात्र “उमेदवार कोण आणि त्यांची अधिकृत यादी श्रमजीवी संघटनेकडून अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही”, असे सांगत श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी या बातमीचे खंडन केले आहे.

मी कोणतीही अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली नसल्याचे सांगत ही बातमी चुकीची आणि खोडसाळ असून दिशाभूल करणारी आहे असा खुलासा आज सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी करत या बतमीबाबत नाराजी व्यक्त केली.

संघटनेच्या बैठकीत केवळ पाठींबा देणार नसल्याचा निर्णय झाला आणि कुठल्या मतदारसंघात कोण उमेदवार असेल याबाबतची चर्चा आणि अंतिम निर्णय येत्या काळात संघटनेच्या *उच्चस्तरीय शिखर समितीच्या* बठकीत घेऊन त्यानंतर पुढील निर्णय आणि भूमिका अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केला जाईल असे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी सांगितले.

व्हायरल संदेश आणि फेक न्यूज च्या आधारावर संघटनेची भूमिका कुणीही गृहीत धरू नये, संघटनेचे सर्व निर्णय आणि भूमिका ही लोकशाही मार्गाने सर्व समावेशक चर्चा होऊन केले जातात असेही वारणा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here