पालघर योगेश चांदेकर:

श्री अष्टविनायक ग्रुप दिनकरपाडा यांच्या वतीने 7 जानेवारी ते 10 जानेवारी पर्यंत कब्बडी स्पर्धेचे नियोजन केले होते. त्यामधे प्रथम पारितोषिक 51000, द्वितीय पारितोषिक 21000, तृतीय पारितोषिक 15000, चतुर्थ पारितोषिक 11000 होते. या स्पर्धेला भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगूले यांनी भेट दिली.

स्पर्धा झाल्यानंतर बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक ठाणे महानगरपालिका देवराम नाना भोईर ,देवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य सचिव तानाजी भाऊ मोरे, राष्ट्रवादी युवकचे महाराष्ट्र राज्याचे सचिव तौसिफ भुरे, वाडा तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेश (बंटी )पाटील, पत्रकार आनंत दुबिले ,सांपोरोडे -मागांठणे उपसरपंच जानवी पाटील, भाजपाचे युवा नेते भूषण पाटील,भिवंडीचे माझी कबड्डीपटू अमोल पुंडलिक , उमेश म्हात्रे दरम्यान कबड्डी स्पर्धा पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सुरेश विशे, प्रमोद विशे, कल्पेश पाटील, रवींद्र बागुल, विजय मोकाशी , विशे इत्यादी सदस्यांनी खूप मेहनत घेतली

विजेते संघ :

प्रथम पारितोषिक – Jay hanuman Enterprises
द्वितीय पारितोषिक – dhruv Warrior’s
तृतीय पारितोषिक – 7star lion’s
चतुर्थ पारितोषिक – Sai Ram Rox
सामानवीर- ऋतिक किरण चौधरी
मालिकावीर- निकेतन मोरे
अष्टपयलु ख़िलाड़ू – अक्षय सुदाम दिनकर
बेस्ट पकड़ – जय बापू पाटील
शिस्तबद्द संघ – Dr.Girish Chaudhari superstar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here