पालघर – योगेश चांदेकर
काल दहावीचा निकाल जाहीर झाला असून प्रत्येक विद्यार्थ्याला आणी त्याच्या कुटुंबियांना निकालाची आणी मिळणाऱ्या टक्केवारी ची उत्सुकता होती .जास्तीत जास्त टक्केवारी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक असला तरी पालघर मधील डहाणू तालुक्यातील उर्से येथील आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या गणेश लडे यांने टक्केवारीत मॅजिक फिगर गाठली आहे . गणेशने प्रत्येक विषयात 35 मार्क मिळवून 35 टक्के ने उत्तीर्ण झाला आहे .
गणेश डहाणू तील म्हसाड येथील रहिवाशी असून घरा शेजारील उर्से या आश्रमशाळेत तो शिक्षण घेत होता . अस असलं तरी आदिवासी कुटुंबाबत जन्मलेल्या गणेशची सध्या परिसरात सोशल मीडिया वर चांगलीच चर्चा सुरू आहे .